मुंबई – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. श्रीरामपूर येथील निपाणी वडगाव संतोश गायधनी या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातील शेतीच्या वादातून हा इशारा देण्यात आलाय.
1 मे महाराष्ट्र दिनाला राळेगणसिद्धीमध्ये जाऊन हजारे यांची हत्या करीन, असा इशारा संतोष गायधनी यांनी दिला आहे. शेतीच्या वादातून संगनमताने आपल्या कुटुंबावर अन्याय झालाय त्यामुळे अण्णा हजारेंसह प्रशासनाला निवेदन देखील दिलं होतं.
मात्र, निवेदन देऊन देखील पदरी निराशा लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून माझं कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगतेय. अशी व्यथा संतोष गायधने यांनी मांडली आहे. त्यामुळेच संतोष यांनी अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचा इशारा दिला.