चंदीगड – पंजाब येथील लुधियाना शहरातील कोर्ट परिसरात झालेल्या बॉम्ब स्फोटामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात चौघे गंभीर झाले असल्याची देखील माहिती आहे. या स्फोटामागे नेमके कोण आहे याबाबत चौकशी सुरु असून प्राथमिक माहितीनुसार न्यायालयाच्या स्वछतागृहात हा स्फोट झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच पंजाब पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी तसेच राज्यातील प्रमुख नेत्यांनी याबाबत बीभाष्य केले आहे.
प्राप्त माहितीनुसार गुरुवारी दुपारी १२ वाजून २२ मिनिटांनी न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात हा स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की यामुळे स्वच्छतागृहाच्या भिंती पडल्या तर आसपासच्या इमारतीच्या काचा फुटल्या.
याबबाबत बोलताना मुख्यमंत्री चन्नी यांनी, “मी लुधियानाला निघालो आहे. पंजाब विधानसभा निवडणुका जवळ आल्याने काही देश-विरोधी शक्ती याप्रकारच्या कारवाया करत आहेत. जे दोषी असतील त्यांना शासन करण्यात येईल.” अशी प्रतिक्रिया दिली.
I am going to Ludhiana. Some anti-national elements are doing such acts as Assembly elections are nearing. The government is on alert. Those found guilty will not be spared: Punjab CM Charanjit Singh Channi on explosion at Ludhiana District Court Complex pic.twitter.com/T6trPdLr6b
— ANI (@ANI) December 23, 2021
पंजाबच्या माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बॉम्बस्फोटाच्या घटनेबाबत भाष्य करताना, “लुधियाना न्यायालय परिसरात बॉम्बस्फोट झाल्याची बातमी आहे. यामध्ये दोंघांचा मृत्यू झाल्याचे ऐकून दुःख झाले. जखमी झालेल्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. पंजाब पोलिसांनी या बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन शोध घ्यावा.” असे म्हंटले.
Disturbing news of a blast at Ludhiana court complex. Saddened to know about the demise of 2 individuals, Praying for the recovery of those injured. @PunjabPoliceInd must get to the bottom of this.
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) December 23, 2021