नवी दिल्ली : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची पोलीस बंदोबस्तात असताना खुलेआम हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोन्ही गँगस्टर भावांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. वाटेत माध्यमांशा हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला. यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये ही सर्व घटना घडली. यानंतर तिन्ही आरोपींनी आत्मसमर्पण केले. या तिन्ही आरोपींनी अतिक, अशरफ यांची हत्या का केली, यामागे त्यांचा काय हेतू होता, हे अजूनही पुढे आले नाही.
#BreakingNews: Gangster Atiq Ahmad, his brother Ashraf killed in a firing in Prayagraj. Two-three people reportedly opened fire on them. pic.twitter.com/ffudh1JhUd
— Press Trust of India (@PTI_News) April 15, 2023
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर माध्यम प्रतिनिधी म्हणून आले होते. जेव्हा अतीक अहमदला विचारण्यात आलं की, तो मुलगा असदच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकला नाही, तेव्हा तो म्हणाला की, “घेऊन नाही गेले, तर नाही गेलो.” त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा दोन नंबराच मुलगा असद याला दोन दिवसांपूर्वी झाशीमध्ये पोलिसांनी चकमकीत ठार केले होते . त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही यामध्ये मारला गेला होता. उमेश पाल हत्या प्रकरणातील तो प्रमुख आरोपी होता.
दरम्यान, २००५ मध्ये बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणात अतिक अहमद आरोपी होता. तेव्हापासून तो फरार होता. पण नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी अतिकला गुजराच्या साबरमती तुरुंगातून त्याला नुकतंच प्रयागराज तुरुंगात हलवले होते. आपल्याला गुजरातच्या तुरुंगातून उत्तर प्रदेशात ट्रान्झिट रिमांड नको होती असे त्याने म्हटले होते, पण अखेर त्याला जी भीती वाटत होती ती खरी ठरली आहे.