गोधेगाव येथील घटना
नेवासा – शेती वाटपाच्या कारणावरून होणाऱ्या भांडण-तंट्याच्या त्रासाला कंटाळून बापाने मुलाच्या डोक्यात फळी मारून खून केल्याची संतापजनक घटना गोधेगाव (ता.नेवासा) येथे घडली. शिवाजी जाधव असे मयत मुलाचे नाव आहे. याबाबत मुलाच्या आईने नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी नराधम पित्यास ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहे.
गोधेगाव येथील शेती वाटपाच्या कारणावरून मुलगा शिवाजी दादासाहेब जाधव आणि वडील दादासाहेब सारंगधर जाधव यांच्यामध्ये शेती वाटपाच्या कारणावरून मंगळवारी (दि.१४) कडाक्याचे भांडणे झाले. यावेळी दादासाहेब जाधव याने मुलगा शिवाजी जाधव याला फळीने मारहाण केली. या मारहाणीत मुलगा शिवाजी जाधव हा मयत झाला. याप्रकरणी मुलाची आई अलका जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.