नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याच्या दरात सुधारणा झाल्यानंतर भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात बुधवारी मोठ्या प्रमाणात वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात आज सोन्याचा भाव 438 रुपयांनी वाढून 46,214 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 633 रुपयांनी वाढून 62,140 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
बऱ्याच दिवसापासून सोने घसरणीवर होते. मात्र आता जागतिक बाजारात सोन्याकडे काही लोकांचा कल वाढत असल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.