नवी दिल्ली – आज सकाळ पासून तुमच्या पैकी कित्येकांच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज आला असेल अनेकांना नेमका हा मेसेज कशासाठी आहे हे समजले नसेल अनेक वापरकर्ते या मेसेजमुळे गोंधळले असेल.
काहींनी हा मसेज सरकारी असल्यामुळे दुर्लक्ष केले असेल, पण आत्तापर्यंत तुम्ही मोबाईलवर येणाऱ्या सरकारी मेसेजकडे दुर्लक्ष केलं असेल, तर ही महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आहे. सरकारने इंडियन वायरलेस टेलिग्राफी नियम, 2023 अंतर्गत काही अनिवार्य नियम आणले आहेत. आजपासून नवे नियम लागू झाले आहेत.
सरकारकडून मोबाईलवर पाठवलेल्या संदेशाचा अलर्ट किमान ३० सेकंद वाजेल. तसेच, पाठवलेला संदेश वाचल्याशिवाय, आपण स्क्रीनवर काहीही करू शकणार नाही. कारण जोपर्यंत मेसेज वाचला जात नाही तोपर्यंत तो मेसेज स्क्रीनवरून हटवला जाणार नाही. भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने Indian Wireless Telegraphy (Cell Broadcasting Service for Disaster Alerts) Rules, 2023 जारी केले आहे. आजपासून नवा आदेश लागू होणार आहे. सरकारने मोबाईल कंपन्यांना फोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर (Emergency alert) देणं बंधनकारक केलं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार इमर्जन्सी अलर्ट फीचरशिवाय स्मार्टफोनच्या विक्रीवरही भारतात बंदी घालण्यात येईल. या सर्वासाठी सरकारने मोबाईल कंपन्यांना ६ महिन्यांची मुदत दिली आहे.
सध्या भारतासह जगभरात नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे इमर्जन्सी अलर्ट फीचर अनेक देशांतील स्मार्टफोन कंपन्यांनी दिले आहे. पण भारतात विकल्या जाणार्या स्मार्टफोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर उपलब्ध नाही. ज्या स्मार्टफोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट फीचर देखील आहे, ते अॅक्टिव्ह मोडमध्ये नाही. अशामध्ये भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या इशाऱ्याबाबत सरकार सतर्क झाल असल्यानं हा निर्णय घेत आहे.
असा मेसेज येऊन रिंग वाजली असेल तर घाबरून जाऊ नका हे टेस्ट अलर्ट होते सरकारी आणि वायरलेस कम्युनिकेशन डिपार्टमेंट, भारत सरकार कडून भविष्यात काही महत्वाचे अपडेट म्हणजे अतिवृष्ट / भूकंप / वैद्यकीय अपडेट अश्या स्वरुपात मिळणार आहेत.
नियम काय आहे ?
प्रत्येक फोनवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये मेसेज प्रसारित करणे अनिवार्य केले आहे
– स्मार्टफोन असो किंवा फीचर फोन, त्यावर संदेश दिसला पाहिजे अशा संदेशांसाठी 30 सेकंदांसाठी प्रकाश, ध्वनी आणि कंपन अनिवार्य झाले आहे.
फोनमध्ये किमान २४ तास अलर्ट मेसेज राहायला हवा.
– हा मेसेज स्क्रीनवर राहील जोपर्यंत यूजर तो पाहिल्यानंतर स्वीकारत नाही.
– फोनच्या वैशिष्ट्य सूचीमध्ये प्रसारणासाठी स्वतंत्र श्रेणी
– अलर्ट मेसेज ऑडिओ मेसेज म्हणून प्ले केले जातील.