मंचर – सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव-शिरूरमधील रस्ते आणि इतर कामांसाठी 54 कोटी 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णु हिंगे यांनी दिली. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून जुलै 2023 मध्ये राज्य शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पात आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील रस्ते, लहान पूल व भौमितिक सुधारणा कामांसाठी आदिवासी क्षेत्रासाठी 29 कोटी 80 लाख रुपये, तर बिगर आदिवासी क्षेत्रासाठी 25 कोटी रुपये असे एकूण 54 कोटी 80 लाख रुपयाच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भाग – 29 कोटी 80 लाख रुपये मंजूर झाले असून, त्यात कुशिरे खुर्द ते महाळुंगे रस्ता सुधारणा करणे 4 कोटी, डिंभे-बोरघर-आहुपे रस्त्याची सुधारणा करणे 3 कोटी 30 लाख, तळेघर फलोदे पाटण रस्ता सुधारणा करणे 4 कोटी, वैदवाडी ते ढाकाळे रस्ता सुधारणा करणे 5 कोटी, राजेवाडी ते म्हसळेवाडी – सागाची वाडी रस्ता बांधकाम करणे 2 कोटी, पोखरी ते साबाळेवाडी रस्ता सुधारणा करणे 3 कोटी, बोरघर-तांबे रस्ता सुधारणा करणे 2 कोटी, डोण ते हातविज रस्ता बांधकाम करणे 1 कोटी 50 लाख, माळीण-पसारवाडी ते लेंभेवस्ती रस्ता 3 कोटी, पिंपरगणे वाघोबाची वाडी रस्ता सुधारणा करणे 1 कोटी 80 लाख, रांजणगाव-मलठण-पारगाव-नारायणगाव रस्ता पारगाव येथे घोडनदीवर पुलाचे व पोहोच मार्गासाठी भूसंपादन करणे 1 कोटी 50 लाख, बेल्हे-लाखणगाव-पाबळ रस्ता लाखणगाव येथे घोडनदीवर पुलाचे व पोहोच मार्गासाठी भूसंपादन करणे 50 लाख, घोडेगाव नारोडी कळंब खडकी निरगुडसर लोणी सविंदणे रस्ता लहान पुलाचे बांधकाम व भौमितिक सुधारणेसह रस्त्याची सुधारणा करणे 5 कोटी.
शिरूर तालुक्यातील कामे
भाकरेवाडी-भैरवनाथवाडी-टाकळी हाजी-म्हसे ते डोंगरगण रस्ता सुधारणा करणे (ता. शिरूर) 4 कोटी, घोडेगाव-नारोडी-कळंब-निरगुडसर-लोणी-सविंदणे रस्ता मध्ये लहान पुलाचे बांधकाम व रस्त्याची भौमितिक सुधारणा 1 कोटी 50 लाख, शिक्रापूर-पिंपळे खालसा-हिवरे-कवठे-फाकटे-चांडोह रामाला मिळणारा रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरण 4 कोटी, शिकापूर-गणेगाव खालसा-मलठण टाकळी हाजी जांबुत रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करणे 5 कोटी 50 लाख, शिक्रापूर-जातेगाव खुर्द-करंदी पऱ्हाडमळा केंदूर कनेरसर रस्ता सुधारणा करणे 3 कोटी रुपये.