नवी दिल्ली – यंदाचा वनडे वर्ल्ड कप 2023 यावर्षी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि आतापासूनच हा वर्ल्ड कप कोण व कसं जिंकणार याचे विश्लेषण सुरू झाले आहे. वर्ल्ड कप 2023 सुरु होण्यासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी बाकी असून, अनेक तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. अश्यातच आता यंदाच्या या वनडे वर्ल्ड कप विजेत्याबद्दल मोठी भविष्यवाणी झाल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, वर्ल्ड कपला अजून 7 महिने बाकी असतानाच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ‘ब्रेट ली’ ने नुकतीच एक भविष्यवाणी केली आहे. कुठला संघ यंदा वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवणार? हे त्यानं सांगितलं आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला.., ‘न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड या टीम्स विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. भारताच वर्ल्ड कप विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, असं ब्रेट ली ने म्हटलय.
तसेच, यंदा वर्ल्ड कपमध्ये भारताला भारतात हरवणं कठीण आहे. टीम इंडियाला भारतीय परिस्थितीबद्दल जास्त माहित आहे. त्यामुळे भारतच वर्ल्ड कप 2023 विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.’ असं ब्रेट ली ने म्हंटलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ब्रेट ली बोलत होता. दरम्यान, यंदाचा वनडे वर्ल्ड कप 2023 हा भारतात होणार असल्याने अर्थात यजमान संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.