नवी दिल्ली: जगात एकीकडे करोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक राष्ट्र एकमेकांची मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहे. त्यातच आता भारत बायोटेक या कठीण काळात मोठा फटका बसला आहे. कारण ब्राझील सरकारने लसीसाठी भारत बायोटेक सोबत केलेला करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्राझीलबरोबर 32.4 कोटी डॉलर चा करार भारत बायोटेकने केला होता. त्यामुळे एवढा मोठा करार स्थगित झाल्यामुळे भारत बायोटेकला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या रोपानंतर देशाने हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्राझीलचे आरोग्यमंत्री मार्सेलो किरोगा यांनी ही माहिती दिली. बोल्सोनारो यांनी कोणत्याही प्रकारची अनियमितता नाकारली आहे.
ब्राझीलमध्ये या करारावर बरेच प्रश्न उपस्थित होत होते, त्यानंतर आता 32 कोटी डॉलर्सचा हा करार रद्द करण्यात आला आहे. या करारानुसार ब्राझील भारत बायोटेककडून एकूण 20 कोटी लसीचे डोस खरेदी करणार होता. मात्र ब्राझीलमध्ये या करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि जाइर बोल्सोनारो यांच्यावर भ्रष्टाचार लपवण्याचा आरोप करण्यात आला आहे.
ब्राझीलच्या माध्यमांनुसार , या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत लसींसाठी केलेला करार स्थगित राहिल. दरम्यान ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाकडून वारंवार दावा केला जात आहे की या करारात कोणताही गैरप्रकार करण्यात आलेला नाही.
यापूर्वी ब्राझीलने मंत्रालयाने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सीजीयूच्या प्राथमिक विश्लेषणानुसार करारामध्ये कोणतीही अनियमितता नाही, परंतु त्या पाळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.