IPL 2024 (KKR vs SRH Qualifier 1) : कोलकाताने गाठली अंतिम फेरी, हैदराबादचा 8 गडी राखून केला पराभव…

IPL 2024 ( KKR vs SRH Qualifier 1 Match Result) : आज आयपीएल 2024 स्पर्धेच्या फायनलच्या तिकिटासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) क्वालिफायर-1 सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने राहुल त्रिपाठीच्या 55 धावांच्या जोरावर 19.3 षटकांत 159 धावा केल्या, पण केकेआरने श्रेयस आणि वेंकटेशच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 13.4 षटकांत दोन गडी गमावून 164 धावा करत सहज विजय मिळवला. कर्णधार श्रेयसने 24 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा तर वेंकटेश अय्यरने 28 चेंडूत पाच चौकार अन् चार षटकारांच्या साह्याने नाबाद 51 धावांची खेळी केली.
What a memorable 𝗞𝗻𝗶𝗴𝗵𝘁 for the men in purple 💜
Unbeaten half-centuries from Venkatesh Iyer 🤝 Shreyas Iyer
The celebrations continue for the final-bound @KKRiders 😎
Scorecard ▶️ https://t.co/U9jiBAlyXF#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/xBFp3Sskqq
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024
तत्पूर्वी, टी. नटराजनने सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजला बाद करून केकेआरला पहिला धक्का दिला. गुरबाज 14 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने सुनील नरेनला बाद करून केकेआरला दुसरा धक्का दिला. नरेन 16 चेंडूत 21 धावा करून बाद झाला.
कोलकाताने अशा प्रकारे क्वालिफायर-1 मध्ये अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवला आणि IPL 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला. पराभवानंतरही हैदराबादचा संघ स्पर्धेबाहेर झालेला नाही आणि विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश करण्याची आणखी एक संधी त्यांना मिळणार आहे.
हैदराबादचा सामना आता बुधवारी क्वालिफायर-2 मध्ये आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणाऱ्या एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी होणार आहे. क्वालिफायर-2 मधील विजेत्या संघाचा सामना रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात केकेआरशी होईल.
तत्पूर्वी, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आयपीएल 2024 स्पर्धेतील क्वालिफायर-1 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादला 19.3 षटकांत 159 धावांत रोखले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादची सलामी जोडी पॉवरप्लेमध्ये धमाका करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरली पण मिचेल स्टार्कने त्याचे सगळे मनसुबे उधळून लावले. हैदराबादला प्लेऑफमध्ये पोहचवणारे दोन्ही दिग्गज क्वालिफायर-1 मध्ये फ्लाॅप ठरले.
Innings Break!
A sharp effort on the field by Kolkata Knight Riders 👏👏
Chase on the other side ⏳
A place in the final on the line ‼️
Scorecard ▶️ https://t.co/U9jiBAl187#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/2gdzlOAi5E
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024
सामन्यातील पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर,मिचेल स्टार्कने दुसऱ्याच चेंडूवर सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का दिला. स्टार्कने ट्रॅव्हिस हेडला क्लीनबोल्ड (त्रिफळाचित)केले. हेड शून्यावर बाद झाला. हेड गेल्या सामन्यातही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला होता. पहिल्या धक्क्यातून सावरत नाही तोच वैभव अरोराने दुसऱ्या षटकातील पाचव्या (1.5) चेंडूवर अभिषेक शर्माला बाद करून केकेआरला दुसरे यश आणि हैदराबादला दुसरा मोठा धक्का दिला. अभिषेकला वैभवने रसेलकरवी झेलबाद केलं. अभिषेक चार चेंडूत तीन धावा करून बाद झाला.
पहिला बळी घेतल्यानंतर मिचेल स्टार्क एवढ्यावरच थांबला नाही आणि 5व्या षटकात आपले तिसरे षटक टाकायला आला आणि त्याने केकेआरला लागोपाठ दोन चेंडूत दोन मोठे धक्के दिले. त्याने पाचव्या षटकाच्या 5व्या चेंडूवर नितीशकुमार रेड्डी (09) याला गुरबाजकरवी झेलबाद केल्यानंतर शाहबाज अहमदला हेडसारखे क्लीन बोल्ड (त्रिफळाचीत) केले. स्टार्कने शाहबाजला खाते उघडण्याची संधीही दिली नाही.अशाप्रकारे पॉवरप्लेमध्ये स्टार्कने आपल्या 3 षटकांत 3 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
अवघ्या 5 षटकातच हैदराबादची 4 बाद 39 अशी अवस्था झाली होती. पॉवरप्लेमध्ये 4 गडी गमावल्यानंतर, राहुल त्रिपाठी आणि हेनरिक क्लासेन संघाचा डाव सावरला. यादरम्यान, कठीण परिस्थितीत राहुल त्रिपाठीने शानदार फलंदाजी करत 11व्या षटकात वरुण चक्रवर्तीला चौकार मारून आपले अर्धशतक आणि संघाच्या धावसंख्येचे शतक पूर्ण केले. राहुलने 29 चेंडूत अर्धशतक ठोकले. संघाची धावसंख्या शंभरीपार होताच अकराव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर (10.6) वरुण चक्रवर्तीने सनरायझर्स हैदराबादला पाचवा धक्का दिला. हेन्रिक क्लासेन षटकार मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर रिंकू सिंगकरवी झेलबाद झाला. 21 चेंडूत 32 धावा करून क्लासेन पॅव्हेलियनमध्ये परतला. क्लासेन आणि त्रिपाठीने पाचव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली.
हैदराबादचा निम्मा संघ 101 धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर लगेचच चौदाव्या षटकातील दुसऱ्या (13.2) चेंडूवर सनरायझर्स हैदराबादला राहुल त्रिपाठीच्या रूपाने सहावा धक्का बसला आहे. सेट झालेला फलंदाज राहुल धावबाद झाला आणि त्याची शानदार खेळी संपुष्टात आली. राहुल 35 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्यानंतर याच षटकातील पुढच्या चेंडूवर (13.3) सुनील नरेनने प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या सनवीर सिंगला शून्यावर क्लीनबोल्ड केले आणि हैदराबादचा पुन्हा बॅकफुटवर आला.
IPL 2024 : लीग स्टेजनंतर ‘हे’ खेळाडू ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून बाहेर, विराट कोहलीचा दबदबा कायम…
यानंतर पुढील दोन षटकात हैदराबादने आणखी दोन गडी गमावले.हैदराबादने 15 व्या षटकात 125 धावांवर आठवी विकेट गमावली. हर्षित राणाच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात अब्दुल समद सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याला 12 चेंडूत 16 धावा काढत्या आल्या. लगेचच 16व्या षटकात 126 धावांवर भुवनेश्वर कुमारला शुन्यावर पायचीत (LBW) करून वरुण चक्रवर्तीने हैदराबादला 9वा धक्का दिला. हैदराबादचा संघ 150 धावाही करू शकणार नाही असं वाटत असतानाच कर्णधार पॅट कमिन्सने शानदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या 150 धावांच्या पुढे नेली. शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रसेलने कमिन्सला यष्टीरक्षक गुरबाजकरवी झेलबाद करत हैदराबादचा डाव 159 धावसंख्येवर संपुष्टात आणला. कर्णधार कमिन्स 24 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकाराच्या साह्याने 30 धावावर बाद झाला तर विजयकांत वियासकांत हा 5 चेंडूत 7 धावा काढून नाबाद माघारी परतला.
या सामन्यात हैदराबादची फलंदाजी इतकी खराब झाली होती की, संघाचे केवळ चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले.कोलकाताच्या गोलंदाजीबदल बोलायचे झाले तर मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, ज्याने पॉवरप्लेमध्येच 3 बळी घेतले होते. स्टार्कनंतर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने 2 महत्त्वाचे बळी घेतले. स्टार्कने 4 षटकात 34 तर वरूणने 4 षटकात 26 धावा दिल्या. याव्यतिरिक्त आंद्रे रसेल, सुनील नरेन, हर्षित राणा आणि वैभव अरोड़ा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विशेष म्हणजे या सामन्यात केकेआरच्या प्रत्येक गोलंदाजाने यश संपादन केले आणि हैदराबादला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात यश मिळवले.





