चेन्नई – तामिळनाडू सरकारने पेट्रोल कर तीन रुपये प्रति लीटर कमी करण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे राज्याला दरवर्षी 1160 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. तामिळनाडू विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.
आज पासून राज्याचे अधिवेशन सुरु झाले आहे. अर्थमंत्री पीटीआर पलानीवेल त्यागराजन यांनी राज्याच्या इतिहासातील पहिला ई-बजेट सादर केले. याशिवाय तामिळनाडूमध्ये, मुख्य विरोधी पक्ष एआयएडीएमकेच्या आमदारांनी निषेध म्हणून शुक्रवारी अधिवेशनादरम्यान सभागृहातून बाहेर पडले.
खरेतर, स्पीकर अप्पावू यांनी विरोधी पक्षाला बोलू दिले नाही, यामुळे आमदारांनी रागाने सभागृहाचा त्याग केला. तामिळनाडूचे पहिले विशेष कृषी बजेट 14 ऑगस्ट रोजी राज्याचे कृषी मंत्री एमआरके पनीरसेल्वम सादर करणार आहेत.
सलग चार दिवस राज्याच्या अर्थसंकल्प आणि कृषी अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा होईल.
अर्थमंत्री यांचे ई-बजेट मधील घोषणा
– प्रसूती रजा बजेटमध्ये 9 महिन्यांवरून 12 महिने
– 500 कोटी रुपये खर्च करून हवामान बदलासाठी केंद्र स्थापन केले जाणार
– राज्यातील सर्व बचतगटांना 20,000 कोटी रुपये क्रेडिट म्हणून वितरित केले जाणार
अर्थमंत्री म्हणाले, राज्यातील सर्व 79,395 छोट्या गावांमधील प्रत्येक व्यक्तीला दररोज 55 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पावले उचलली जातील. त्याचबरोबर एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 27 शहरांमध्ये भूमिगत गटार योजना लागू केली जाईल.