Baramati Lok Sabha Election 2024| बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूकाचा सामना रंजक असणार आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. आज 18 एप्रिल रोजी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी जोरदाररित्या शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे.
… तर उद्या ते मेरीटवर मलाच मतदान करतील
त्यापूर्वी “विद्यमान खासदारांनी बारामतीमध्ये विकासनिधी आणला नाही,” असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देत सुप्रिया सुळे यांनी “कदाचित माझा मराठीतला कार्य अहवाल वाचला नसावा. मी आजच माझा अहवाल त्यांना पाठवून देईन. त्यांनी यासाठी थोडासा जरी वेळ काढला तर उद्या सकाळी ते मेरीटवर मलाच मतदान करतील,” असा दावा केला आहे. Baramati Lok Sabha Election 2024|
‘रामकृष्ण हरी वाजवा तुतारी’; सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर
याशिवाय नुकतेच अजित पवारांनी बारामतीमध्ये “आमच्या नावासमोरची बटणं कचाकच दाबा, म्हणजे तुम्हाला विकासनिधी द्यायला आम्हालाही बरं वाटेल, नाहीतर आम्ही हात आखडता घेऊ”, असं विधान केलं होतं. यानंतर सुप्रिया सुळेंना यांनी “यावर माझं एकच उत्तर, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी”, असे प्रत्युत्तर दिले.
तसेच “ही माझ्यासाठी वैयक्तिक लढाई नाही तर वैचारिक लढाई आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आहे. त्यामुळे समोर कोण लढतंय, याचा मी फारसा विचार करतच नाही. तसेच मी कुणावर वैयक्तिक टीका करत नाही. माझ्यावर हे संस्कारच नाही,” असेही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल Baramati Lok Sabha Election 2024|
दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला. “शरद पवारही आमच्याकडे येणार होते पण ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलला”, असा दावा फडणवीसांनी केला होता. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस खरं बोलले यासाठी मी त्यांचे आभार मानते. काश्मीर ते कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे, त्यांना शरद पवार किंवा आमच्या कुणाही विरोधात षडयंत्र करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नव्हता,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा:
“निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा”, वादग्रस्त विधानानंतर अजित पवार स्पष्टच म्हणाले,’गंमतीने हसत हसत…’