वॉशिंग्टन, दि. 12 – अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या नवीन मंत्रिमंडळाची जुळवाजुळव सुरू केली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध राजनितीज्ञ रोन क्लायन यांना बायडेन यांनी व्हाईट हाऊसमधील सर्वात महत्वाच्या पदावर “चीफ ऑफ स्टाफ’ पदावर नियुक्त करण्याचे नियोजन केले आहे.
व्हाईट हाऊसच्या “चीफ ऑफ स्टाफ’ या पदावरील व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षांच्या दैनंदिन वेळापत्रकाचे नियोजन करत असतो. “चीफ ऑफ स्टाफ’ हा अध्यक्षांचा द्वारपाल म्हणूनच ओळखला जात असतो. याशिवाय नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ, अनुभवी आणि गुणवान सहकाऱ्यांची टीम उभी करण्याची जबाबदारीही क्लायन हे निभावणार आहेत.
क्लायन यांनी यापूर्वी उपाध्यक्ष अल गोर यांच्यासाठीही “चीफ ऑफ स्टाफ’ आणि ऍटर्नी जनरल जनेट रेनो यांच्यासाठी समन्वयक अणि सिनेटमधील डेमोक्रॅटिक लीडरशीप कमिटीचे स्टाफ डायरेक्टर म्हणूनही म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.