बायडेन यांच्या मंत्रिमंडळात तृतीयपंथीयाचा समावेश

वॉशिंग्टन दि 19 – अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी त्यांच्या भावी मंत्रिमंडळामध्ये तृतीयपंथी महिलेचा समावेश केला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या उपमंत्री म्हणून रचेल लिवाईन यांचा समावेश करण्यात आला आहे. व्यवसायाने बालरोगतज्ञ आणि पेनसिल्वेनिया मधील माजी फिजिशियन जनरल असलेल्या लिवाईन यांना विद्यमान गव्हर्नर टॉम वुल्फ यांनी 2017 साली पेनसिल्वेनियाच्या फिजिशियन जनरल म्हणून नियुक्‍त केले होते. पेनसिल्वेनिया मधून त्या सिनेटवर निवडून गेल्या. करोनाच्या साथीच्या काळात त्यांनी विशेष उल्लेखनीय काम केले होते. 

डॉक्‍टर रचेल लिवाईन यांना आरोग्य क्षेत्रातील विशेष अनुभव आहे आणि आरोग्य क्षेत्रासाठी आवश्‍यक पावले उजळण्याची यांची क्षमता आहे, असे बायडेन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हॉर्वर्ड विद्यापीठातून पदवी आणि ट्युलेन मेडिकल स्कूल येथून त्यांनी उच्चशिक्षण घेतले आहे. तसेच असोसिएशन ऑफ स्टेट अँड टेरिटोरियल हेल्थ ऑफिशिअल या संघटनेच्या त्या अध्यक्षा आहेत. अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत आणि वैद्यकीय क्षेत्रात त्याच्या गैरवापराबाबतही त्यांनी लेखन केले आहे. युवकांच्या तसेच तृतीयपंथी, समलैंगिकांमधील वैद्यकीय समस्यांबाअबतही त्यांनी अभ्यास केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.