मराठी भाषा दिवसानिमित्त विधानभवन परिसरात ग्रंथदिंडी उत्साहात

मुंबई: मराठी भाषा दिवसानिमित्त आज विधानभवन परिसरात मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री  अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

मराठी ग्रंथसंपदा पालखीत विराजमान करून विधानभवनाच्या आवारात मिरवणूक काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांनीही सहभाग दर्शवत पारंपरिक वेशभूषेत आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवले.

#मराठीभाषादिन: “इंग्रजी भाषा हे ज्ञान नसून, फक्‍त माध्यम’

आज जागतिक मराठी भाषा दिन

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.