#SLvWI 2nd ODI : श्रीलंकेचा वेस्टइंडिजवर १६१ धावांनी विजय

हम्बनटोटो(श्रीलंका) : सलामीवीर अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिसच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजीत वाणिदु हसरंगा आणि लक्षण संदाकन यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने मालिकेतील दुस-या एकदिवसीय सामन्यात वेस्टइंडिजचा १६१ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह श्रीलंकेने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अविष्का फर्नांडो सामन्याचा मानकरी ठरला.

वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारताना श्रीलंकेस फलंदाजीस पाचारण केलं होत. त्यानंतर श्रीलंकेने फलंदाजी करताना सलामीवीर अविष्का फर्नांडोच्या १२७(१२३), कुसल मेंडिसच्या ११९(११९) आणि तिसारा परेराच्या ३६(२५) धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ८ बाद ३४५ धावांची मजल मारली होती. विंडीजकडून गोलंदाजीत शेल्डन काॅटरेलने सर्वाधिक ४ तर अलजारी जोसेफने ३ गडी बाद केले.

त्यानंतर विजयासाठी ३४६ धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिज संघाचा डाव ३९.१ षटकात १८४ वर आटोपला आणि त्यांना १६१ धावांनी पराभव पत्करावा लागला. विंडीजकडून फलंदाजीत शाइ होपने ५१(६५), निकोलस पूरनने ३१(४१), कीमो पाॅलने २१(२७) आणि राॅसटन चेजने २०(३०) धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून वाणिदु हसरंगा आणि लक्षण संदाकन यांनी प्रत्येकी ३ तर नुवान प्रदीपने २ आणि एंजेलो मैथ्यूजने १ गडी बाद करत संघास विजय मिळवून दिला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.