नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचा शेजारील देश ‘भूतान’च्या दोन दिवसीय दौऱ्यावर आज सकाळीच रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा भूतान दौरा आहे. तर दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. यावेळी भूतानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच जोरदार करण्यात आलं आहे.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमध्ये शिक्षण विषयक 10 करारांवर स्वाक्षरी करणार आहेत. तसेच मोदींच्या हस्ते इथे काही ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रमही पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.