नवी दिल्ली – संसदेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबरला होणार आहे, अशी माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज दिली. नवीन इमारतीचे क्षेत्रफळ, 64,500 चौरस मीटर असेल आणि अंदाजे 971 कोटी रुपये खर्चून या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
संसदेच्या सध्याच्या इमारतीला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. आता संसदेची नवीन इमारत देशवासियांकडूनच उभारली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. “आत्मनिर्भर भारत’चे ते एक प्रमुख उदाहरण असेल, असे बिर्ला यांनी सांगितले.
संसदेच्या नवीन इमारतीसाठी स्वतंत्र कक्ष सध्याच्या श्रम शक्ती भवनाच्या जागेवर बांधले जातील. नवीन वास्तूमध्ये भव्य संविधान सभागृह, ग्रंथालय, समित्यांसाठी विशेष कक्ष, भोजनालय आणि विस्तीर्ण पार्किंगची व्यवस्थाही असणार आहे. सध्याची संसदेची वास्तू पुरातत्व मारतीमध्ये देशाच्या सांस्कृतिक वैविध्यतेचे दर्शन होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील संसदेचे अधिवेशन या नूतन वास्तूमध्येच होईल, अशी आशा असल्याचेही त्यांनी सांगितले.
संसदेची नवीन वास्तू भूकंप रोधक असेल. या इमारतीच्या बांधकामामध्ये 2 हजार मजूर प्रत्यक्ष अणि 9 हजार जण अप्रत्यक्षपणे सहभागी होतील. या इमारतीत 1,224 खासदार एकत्रितपणे बसू शकतील. तर दोन्ही सभागृहांच्या खासदावारसा असल्याने ती जतन केली जाणार आहे, असेही बिर्ला यांनी सांगितले.