कोपरगाव (प्रतिनिधी) –कोपरगाव नगरपरिषद विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक सहामधील शहर पोलीस ठाणे ते सप्तशृंगी मंदिर रस्त्याच्या कॉंक्रिटिकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी आमदार काळे म्हणाले, सण-उत्सवांच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते पोलीस ठाणे या मार्गाची बॅरिकेडिंक केली जाते. त्यावेळी या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांना उपयोग होत असतो. परंतु मागील काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे सण, उत्सव काळात नागरिकांना त्रास होत होता. या रस्त्यामुळे हा त्रास कमी होणार आहे. मात्र नागरिकांनी रस्ता काम झाल्यानंतर किमान पंधरा दिवस तरी या मार्गावरून जाणे-येणे टाळावे. जेणेकरून रस्त्याचे आयुष्य वाढेल. नगराध्यक्ष व संबंधित नगरसेवकांनी रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी लक्ष द्यावे, अशा सूचना केल्या.
यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस स्टेशन इमारतीचे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, हिरामण गंगुले, सुनील शिलेदार, हाजी मेहमूद सय्यद, नवाज कुरेशी, रमेश गवळी, ऍड. मनोज कडू, राजेंद्र जोशी, डॉ. तुषार गलांडे, संतोष टोरपे, प्रा. अंबादास वडांगळे, राहुल देवळालीकर, रावसाहेब साठे, संदीप कपिले, रवींद्र राऊत, प्रकाश दुशिंग, दादामियॉं शेख, अनिल गायकवाड उपस्थित होते.