पुसेसावळी -सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून चोराडे, ता. खटाव येथे मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व सत्कार रविवार, दि. 10 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. खा. श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असल्याची माहिती सरपंच कृष्णत पिसाळ यांनी दिली.
या कार्यक्रमास माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, गुरुवर्य बळवंत महाराज, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, समाजकल्याण समितीच्या सभापती शिवाजी सर्वगोड, सदस्य सुरेंद्र गुदगे, पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम, माजी सभापती रेखा घार्गे, संदीप मांडवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सागर साळुंखे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार, मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, उदय गुरव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी पशुवैद्यकीय दवाखाना, ज्योतिर्लिंग मळा सामाजिक सभागृह, मांगवडा नवीन डीपी, नांदणी वस्ती जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती या कामांचे भूमिपूजन, बौद्ध वस्ती सिमेंट कॉंक्रिट रस्ता, हायमास्ट लॅम्प, सिद्धनाथ मंदिर सभागृह, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती या कामांचे उद्घाटन आणि कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमास पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विविध गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायट्यांचे चेअरमन, संचालक, ज्येष्ठ नेते, प्रमुख कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. यावेळी गटातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामपंचायत व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आले आहे.