आई ती आईच! कोमात असतानाही तिने बाळाला दिला जन्म

लंडन – करोनाग्रस्त एका गर्भवती महिलेने कोमामध्ये गेली असतानाही मुलाला जन्म दिला असून ते मूल व त्याची आईही आता सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

लस न घेतलेल्या या महिलेला गर्भधारणेदरम्यान करोनाची लागण झाली होती. तिची प्रकृती इतकी बिघडली की ती कोमात गेली. पण जेव्हा ती शुद्धीवर आली आणि डॉक्‍टरांनी सांगितले की, तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला आहे. ही बातमी ऐकून त्या महिलेच्या आनंदाला परावार उरला नाही.

एका अहवालानुसार, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय केल्सी राऊट्‌स 28 आठवड्यांची गर्भवती होती. महिलेला विश्रांती मिळावी म्हणून त्याने तिला इंड्यूज्ड कोमामध्ये पाठवले डॉक्‍टरांनी आपत्कालीन सिझेरियन केलं आणि तिची प्रसूती केली. यावेळी केल्सी बेशुद्ध होती.

केल्सीच्या डिलीव्हरी डेटच्या 12 आठवड्यांपूर्वी तिचं सिझेरियन करण्यात आलं. बाळाच्या जन्मानंतर 7 दिवसांनी ती कोमातून बाहेर आली. तिचे बाळ सुखरुप आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.