विद्यार्थिनींनी लुटला भोंडल्याचा आनंद

भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत भोंडला, रास दांडिया उत्साहात

सांगवी – सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत विद्यार्थिनींनी पारंपरिक गाण्यांवर फेर धरत भोंडला आणि रास दांडियाचा आनंद लुटला. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, तेजल कोळसे-पाटील, शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

हस्त नक्षत्र सुरू झाल्यानंतर हस्त म्हणजे हत्तीची पूजा करून भरभरून धनधान्य दे, सर्वत्र सुख समृद्धी नांदू दे’, अशी प्रार्थना सर्वांनी केली. भोंडल्यात सर्व शिक्षिकांनी सक्रिय सहभाग दर्शविला. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणत भोंडला साजरा केला. यावेळी पारंपरिक पद्धतीने विविध गाण्यांचे गायन करण्यात आले. यामध्ये ऐलमा पैलमा एक लिंबू झेलू’, अक्‍कणमाती कारल्याचा वेल लाव गं सुने’, आड बाई आडोणी’ अशा गाण्यावर विद्यार्थिनींनी समवेत शिक्षिकांनीही फेर धरून या भोडल्याचा आनंद घेतला.

या माध्यमातून विद्यार्थिनींनी गरबा व दांडियाचा आनंद मनसोक्‍त लुटला. प्रशालेच्या अध्यक्षा आरती राव म्हणाल्या, भोंडल्यासारखे कार्यक्रम राबवल्याने मुलींना हक्काचे व्यासपीठ मिळते. तसेच त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडण्यास मदत होते. नव्या पिढीसाठी अशा कार्यक्रमाची आवश्‍यकता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)