पुणे – मान्सूनच्या परतीसाठी आवश्यक पोषक वातावरण तयार होत असल्याने राज्यातील अनेक भागांत सध्या वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
दरम्यान, पुणे शहरातही गेल्या दोन दिवसांपासून पाऊस आहे. दुपारीपर्यंत उन्हाचे चटके आणि दुपारनंतर ढगांची दाटी आणि जोरदार पाऊस होत आहे.