भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी ही गेल्या काही दिवसांपासून वजन कमी करण्यासाठी जोरात मेहनत करत आहे. मात्र करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन आहे. तेव्हा अशा स्थितीत राणी चॅटर्जी ही आपल्या घरातच वर्कआऊट करत आहे. यासंदर्भात राणीने एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने म्हटले की, होम वर्कआऊट. घरातच राहा, तरच भारत वाचेल, भारत पुढे जाईल. राणीचा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे.
काहींना राणी चॅटर्जी कोण असा प्रश्न पडू शकतो, परंतु भोजपुरी फिल्म उद्योगात तिने 300 हून अधिक चित्रपट केले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने भोजपुरी चित्रपट करणारी ती एकमेव भोजपुरी अभिनेत्री मानली जाते. तसेच ती सर्वाधिक कमाई करणारी नटी देखील आहे. भोजपूरी चित्रपटात लेडी दबंग राणी चॅटर्जीचे भोजपूरी गीत, “ससूरा मे पूछी ना भतार मोटाई पर’ हा व्हीडिओ चाहत्यांत जबरदस्त व्हायरल होत आहे.
गाण्यात राणी चॅटर्जीचा धमाकेदार डान्स हा श्रोत्यांना भावला आहे. यात भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव देखील दिसतात. एका मुलाखतीत राणी चॅटर्जी म्हणते, की आता आपण भोजपुरी चित्रपटात लवकरच बोल्ड भूमिकेत दिसू. राणीने 2004 मध्ये “ससुरा बडा पैसावाला’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. यात मनोज तिवारी यांची प्रमुख भूमिका होती.