भंडारा – महिला डाॅक्टरने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे घडली आहे. डॉ. नेहा पारधी (वय 26, सेजगाव, ता. तिरोडा) असे आत्महत्या केलेल्या महिला डाॅक्टरचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.
डाॅ. नेहा पारधी या दंतरोग तज्ञ होत्या. त्यांचे तिरोडा येथे क्लिनिक आहे. क्लिनीकमध्ये रुग्ण येऊन गर्दी करत असताना डाॅक्टर का आल्या नाही म्हणून कर्मचारी घरी गेला असता डाॅ. नेहा यांनी गळफास लावल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट मिळाली नसल्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. तिरोडा पोलिस अधिक तपास करत आहेत. असलेल्या महिला डॉक्टरने सद्धा राहत असलेल्या भाड्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथिल वीर सावरकर वार्ड येथे घडली आहे.