कार्ला (वार्ताहर) – लाखो भाविकांचे श्रध्दास्थान कुलस्वामिनी आई एकविरादेवी चैत्रीयात्रा सुरवात झाली असून यात्रेची सुरवात देवीचे माहेरघर देवघर येथे पारंपारिक नृत्य व वाद्याच्या गजरात देवीचे बंधू काळभैरवनाथ पालखी सोहळ्याने झाली.देवघर येथील श्री काळभैरवनाथ ट्रस्ट व बांधकाम समिती देवघर व देवघर ग्रामस्थ यांच्या वतीने या सोहळ्याचे संयोजन करण्यात आले.
दरवर्षी चैत्र षप्टीला देवघर येथे एकलीरादेवीचा भाऊ काळभैरवानाथ पालखी सोहळा पार पडतो. कोकण भागातून येणाऱ्या देवीच्या पालख्या देवघर येथे मुख्य गडावर जाण्यापूर्वी काळभैरवनाथ मंदिरात येतात व आई एकवीरा व काळभैरवनाथ यांची भेट घडवत मंदिराला प्रदक्षिणा घालत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. हजारोच्या संख्येने कोळी बांधव या मिरवणुकीत सहभागी होऊन काळभैरवनाथ महाराजांचे दर्शन घेतात.
श्री काळभैरवनाथ ट्रस्टचा वतीने सकाळी काळभैरवनाथ मंदिरात अभिषेक करत मंदिर दर्शनासाठी खुले केले. या वेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या वेळी काळभैरवनाथ ट्रस्ट अध्यक्ष गोंविद कोद्रे, मंदिर जिर्णोध्दार समिती अध्यक्ष मारुती देशमुख, उपाध्यक्ष किसन आहेर,
सचिव अशोक कोदरे, सल्लागार महादू देशमुख, पोलीस पाटील अनंता शिंदे, काळूराम देशमुख, अशोक रोकडे, धोंडू शिंदे, शंकर ढाकोळ, धोंडू आहेर, सुरेश शिर्के, रविराज कोदरे, यशवंत आहेर, मधुकर पवार, गणेश देशमुख, गणेश आहेर, बाबाजी ढाकोळ, रविंद्र देशमुख यांच्यासह देवघर वाकसई सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.