तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – जैन सोशल ग्रुप, तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी हितेश मांगीलाल राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, अशी माहिती जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष किरण ओसवाल यांनी दिली.
या वेळी मावळते अध्यक्ष संजय ओसवाल, किरण ओसवाल, राकेश ओसवाल, राजू शहा, विनोद राठोड, संजय सोलंकी, भरत राठोड उपस्थित होते. येत्या रविवारी (दि. २१) श्री भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन येथील जैन भवन या ठिकाणी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.
रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष हितेश राठोड यांनी केले. कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी इंद्रकुमार ओसवाल, सचिवपदी समीर परमार, खजिनदारपदी निलेश ओसवाल यांची निवड करण्यात आली आहे