राहाता (प्रतिनिधी) – गावोगावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होताना त्यांचे विचार आत्मसात केले तरच खऱ्या अर्थाने जयंती साजरी केल्याचे समाधान मिळेल, असे मनोगत भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केले.
राहाता शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजनचे युवक जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे, तालुकाध्यक्ष दीपक कसबे, दिलीपर वाघमारे, बौद्धाचार्य सोनवणे गुरुजी,
लाला बनसोडे, नाना गायकवाड, संजय कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राहाता शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पुजन करून उपस्थित जनतेला संबोधित केले.