ग्रीन टी हा अनेकांच्या डाएटचा एक भाग आहे. फिट राहण्यासाठी बहुतेक लोकं ग्रीन टी पितात. सकाळच्या वेळेला ग्रीन टी पिणं फायदेशीर आहे. मात्र रात्रीदेखील तुम्ही ग्रीन टी पित असाल, तर तुमच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
सकाळी ग्रीन टी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे. ग्रीन टी मध्ये थीनिन कोर्टिसोलसारखे तणावसंबंधित हार्मोन्स कमी करण्याचं काम करतात. ग्रीन टीमध्ये कॉफीच्या तुलनेत कॅफिनेचं प्रमाण कमी असतं. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार सकाळी ग्रीन टी प्यायल्याने रात्री जोप चांगली लागते.
निरोगी राहण्यासाठी आणि रात्री चांगली झोप लागण्यासाठी सकाळी किंवा दुपारी एक ते दोन कप ग्रीन टी घेणं फायदेशीर आहे. तर रात्री 2 तास आधी ग्रीन टीचं सेवन न करणंच योग्य आहे.
रात्री ग्रीन टी प्यायल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो. झोपेत व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे रात्री आवश्यक असलेली गाढ झोप तुम्हाला लागणार आहे. रात्री नीट झोप न लागल्याने त्यानंतरचा पूर्ण दिवस खराब होईल. दिवसभर तुमची चिडचिड होईल शिवाय झोप अपुरी असल्याने अनेक समस्याही बळावू शकतात.