लखनौ : भारताची नवी गुणवत्ता म्हणून नावारूपाला येत असलेल्या कुस्तीपटू सोनम मलिकने आॅलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकचा पराभव करत साक्षीविरूध्दचा सलग दुसरा विजय नोंदविला.
Sonam Malik downs Sakshi Malik in wrestling trials, makes cut for Olympic qualifiers. #SakshiMalik #WFI
— Press Trust of India (@PTI_News) February 26, 2020
सोनमने या कामगिरीसह भारतीय महिला कुस्ती संघात स्थान प्राप्त केले असून हा संघ आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
रोममधील स्पर्धा तसेच आशियाई स्पर्धांच्या ६२ किलो वजनी गटात पदक मिळवत साक्षीने पात्रता स्पर्धेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले होते. सोनमला या स्पर्धांमध्ये यश मिळाले नव्हते तरीही भारतीय कुस्ती महासंघाने तिला चाचणीसाठी परवानगी दिली होती.