पुणे – आरोग्यव्यवस्थेचा कोविड-19 साथीशी लढा सुरू असताना सध्याचा काळ बिगर- कोविड रुग्णांसाठी, विशेषत: किडनीच्या दुर्धर आजारांशी लढत असलेल्या रुग्णांसाठी खडतर गेला आहे.
भारतामध्ये किडनीशी संबंधित आजारांचे 0.2 दशलक्ष रुग्ण आहेत, ज्यांना वर्षाकाठी 34 कोटी डायलिसिस सत्रांची गरज लागले. सध्या घरच्या घरी डायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस (सीएपीडी) सारख्या अधिक सोयीच्या उपचारपद्धती स्वीकारण्याची गरज आहे.
आरपीएम पद्धतीबद्दल पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजी विभागाचे असोसिएट डायरेक्टर डॉ. तरुण जेलोका म्हणाले, नव्या तंत्रज्ञानामुळे आपण रुग्णांची स्थिती दुरूनही हाताळू शकतो. रिमोट पेशंट मॅनेजमेंटमध्ये रुग्णाच्या घरून त्यांच्या आरोग्याशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सल्लामसलतीसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून माहिती पोहोचविली जाते.