चव वाढवण्यासाठी जेवणात तूपाचा वापर केला जातो. तूप खाल्याने वजन वाढते म्हणून अनेक लोक तूप खाण्याचे टाळतात. मात्र गायीचे तूप खाल्याने वजन वाढत नाही. याउलट वजन कमी होण्यास मदत होते.
गाईच्या तूपात व्हिटॅमिन ए, डी, कॅल्शियम, फाॅस्फरस, मिनरल्स, पोटॅशियम यासारखे बरेच पौष्टिक तत्व असतात. याशिवाय यात ओमेगा-3 व ओमेगा-9 यांसारखे फॅटी अॅसिड देखील असतात. जाणून घ्या तूप खाण्याचे इतरही फायदे.
डोकेदुखी व मायग्रेनमध्ये फायदेशीर
मायग्रेन आणि डोकेदुखीच्या समस्यांमध्ये गायीचे तूप खूप फायदेशीर असते. जर सकाळी व संध्याकाळी जेवण्याच्या अर्ध्यातास आधी गायीच्या तूपाचे दोन थेंब नाकात टाकल्यास यामुळे मायग्रेन पासून लवकर मुक्त होऊ शकता. हा उपाय नियमितपणे केल्यास डोकेदुखी, केस गळणे, डोळ्यांची समस्या दूर होते.
शरीराची दुर्बलता दूर करण्यास उपयुक्त –
शरीर दुर्बल झाले असल्याचे वाटत असल्यास गायीचे तूप यासाठी खूप फायदेशीर आहे. एक ग्लास दुधात एक आर्धा चमचा गायीचे तूप आणि मध मिसळून प्या. नियमितपणे सेवन केल्यास थकवा जाणवत नाही.
गायीचे तूप रोग प्रतिकारकशक्ती वाढवते –
गायीच्या तूपातील सर्व जीवनसत्वे आणि अॅंटी-ऑक्सिडेंट घटकांमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. गायीचे तूप नियमित सेवन केल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढून संक्रमणाच्या आजारांपासून दूर राहता येते.
तुम्हाला किंवा जवळच्या एखाद्यास अशा काही आरोग्याचा त्रास होत असेल, ज्याचा येथे उल्लेख आहे, शक्य तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही आरोग्याशी संबंधित समस्या किंवा रोगाचे निदान किंवा उपचारासाठी येथे दिलेली माहिती वापरू नका. आपण हे करत असल्यास, अशा परिस्थितीत आपल्यास कोणत्याही संभाव्य नुकसानीसाठी दैनिक प्रभात जबाबदार असणार नाही.