नवी दिल्ली – कोरोनामुळे यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन आगामी पावसाळी अधिवेशनात विलीन केले जाईल. दिल्लीत कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असल्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
विशेष म्हणजे गेल्या सप्टेंबरमध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेच्या आठ दिवस आधी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. अल्प कालावधी असूनही संसदेच्या दोन्ही सभाग्रहात अधिवेशनात 25 विधेयके मंजूर झाली होती.
राज्यसभेत गोंधळामुळे रविवारी झालेल्या उर्वरित अधिवेशनासाठी आठ विरोधी सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांनी सलग दहा दिवस काम केले.