सातारा – जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील वर्ग 3 मधील 497 कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ एकाच दिवशी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी पुढाकार घेतल्याने सबंधित कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाच्या वेतनाचा लाभ मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या दि. 2 मार्च 2019 च्या शासन निर्णयाद्वारे सातव्या केंद्रीय वित्त आयोगाचा शिफारस अहवाल विचारात घेऊन राज्य शासकीय व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत कर्मचाऱ्यास त्याच्या सलग सेवेच्या 10, 20, व 30 वर्षानंतर तीन लाभ या योजनेंतर्गत अनुज्ञेय आहेत. याबाबत ज्ञानेश्वर खिलारी यांनी सोमवारी पदोन्नती समितीची बैठक घेवून एकाच दिवशी 497 कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर केला.
या योजनेअंतर्गत आरोग्य आरोग्य सेवक 29, आरोग्य सेविका 74, आरोग्य सहाय्यक (पुरुष) 4, आरोग्य सहायिका 21, आरोग्य पर्यवेक्षक 9, आरोग्य पर्यवेक्षिका 1, आरोग्य सहायिका (एनएम्) 5,औषध निर्माण अधिकारी 10, कुष्ठरोग तंत्रज्ञ 1, बांधकाम कनिष्ठ अभियंता 6, वाहन चालक 1, वरिष्ठ यांत्रिकी 1, लिफ्टमन 1, रायटिंग मुकादम 1, मजूर 12, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी (पं) 6, ग्रामविकास अधिकारी 18, सामान्य प्रशासन सहाय्यक प्रशासन अधिकारी 1, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 2,
वाहन चालक 1, परिचर 20, शिक्षणविस्तार अधिकारी (शिक्षण) 9, प्राथमिक शिक्षक (वरिष्ठ श्रेणी) 239, पशुसंवर्धन पशुधन पर्यवेक्षक 16, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी 4, व्रणोपचारक 3, ग्रामीण पाणी पुरवठा वायू संपडिक आवेदक 2 अशा 497 कर्मचाऱ्यांना लाभ मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आस्थापनाविषयक अनुज्ञेय असलेले सर्व लाभ वेळीच मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषदेने एकाच वेळी 497 कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर केला असून यापुढील काळातही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा निपटारा वेळेत करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार आहे.
– ज्ञानेश्वर खिलारी (मुख्य कार्यकारी अधिकारी)