“धडक’मुळे प्रकाशझोतात आलेल्या जान्हवी कपूरने अत्यंत कष्टाने मोठ्या चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. “रुही’ आणि “गुंजन सक्सेना’मध्येही तिने आपली ही छबी कायम ठेवली होती.
आता तिचे आणखीन काही सिनेमे येत आहेत. त्यातही मल्याळममधील “हेलन’चा हिंदी रिमेक ती करते आहे. या भूमिकेसाठी जान्हवीला खूप कष्ट घ्यायला लागले होते.
आतापर्यंत जेवढे सिनेमे केले त्यावेळी कोणत्याही सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी इतक्या दमल्यासारखे वाटले नव्हते. मानसिक थकवाही आला नव्हता. पण “हेलन’च्यावेळी मात्र खूप दमल्यासारखे झाले होते, असे जान्हवी म्हणाली.
पहिल्या शेड्युलनंतर तर मानसिक आणि शारीरिक दमवले होते. मात्र आताचे शेड्युल अगदी सुटीसारखे वाटते आहे, असेही ती म्हणाली.
दरम्यान “तख्त’ आणि “दोस्ताना 2′ सारख्या तिच्या बऱ्याच दिवसांपासून चाललेल्या सिनेमांच्या रिलीजला आणखीन उशीर लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जान्हवी खूप अस्वस्थ झाली आहे. “तख्त’साठीचे तिचे शूटिंग तिने पूर्ण केले आहे. “दोस्ताना 2′ साठीही तिची उपलब्धता होती.
मात्र आता दोन्ही सिनेमे रखडले आहेत. त्यामुळे सध्या तरी तिचे लक्ष केवळ “हेलन’वरच केंद्रित आहे.