प्रादेशिक पक्षावरच विश्‍वास

सिक्‍कीम हे देशातील छोटेसे राज्य देशाच्या मुख्य राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत नसले तरी तिथे नेहमीच मतदारांनी प्रादेशिक पक्षांवर विश्‍वास दर्शवला आहे. या राज्यामध्ये लोकसभेची एक जागा आहे. सिक्‍कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (एसडीएफ) या पक्षाचे अध्यक्ष पवनकुमार चामलिंग हे 1994 पासून मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान आहेत. त्यांच्या नावावर हा विक्रमच नोंदवला गेलेला आहे. अर्थात, विक्रमी मुख्यमंत्री हा सन्मान मिळवण्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आहे. 11 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये एसडीएफ आणि प्रेमसिंह तामांग यांचा एसकेएम या दोन पक्षांमध्ये जबरदस्त मुकाबला होणार आहे. माजी फुटबॉलपटू बाइचुंग भूतियाही हामरो सिक्‍कीम नावाचा राजकीय पक्ष घेऊन या रणांगणात उतरले आहेत. एसएनपीपीचे अध्यक्ष डेले बारफुंग्पा सांगतात की, कलम 371 (एफ) च्या संरक्षणासाठी राष्ट्रीय पक्षांवर विश्‍वास ठेवता येत नाही.

चामलिंग हे तत्कालीन मुख्यमंत्री भंडारी यांचे सहकारी होते. तथापि, काही मुद्द्यांवरून त्यांच्यामध्ये विसंवाद निर्माण झाला. यातूनच भंडारींनी चामलिंग यांना तुरुंगात पाठवले आणि गंगटोकच्या रस्त्यांवरून दोरीने बांधून फिरवले. यानंतर चामलिंग यांनी सिक्‍कीम डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षाची स्थापना केली. 1994 मध्ये 19 जागा निवडून आणत ते मुख्यमंत्री बनले. या निवडणुकांत भंडारींच्या पक्षाला 29 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्येही चामलिंग आणि त्यांच्या पक्षाचा जलवा कायम राहिला. 2004 च्या निवडणुकांमध्ये तर एसडीएफने सर्वच्या सर्व म्हणजे 32 जागांवर विजय मिळवत विरोधी पक्षांचा सुपडासाफ केला होता. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकांत सिक्‍कीम क्रांतिकारी मोर्चा या नव्याने उदयाला आलेल्या पक्षाने दहा जागा जिंकत पहिल्यांदा चामलिंग यांना झटका दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)