मुंबई – एखाद्या हिरोला पहिल्याच चित्रपटात प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर घेतात असं क्विचितच पाहायला मिळत. मराठी सिनेमात तर हा क्षण दुर्मिळच म्हणाला लागेल. मात्र सैराटाने हे करून दाखवलं. आजही सैराट म्हटलं की डोळ्यासमोर आरची आणि परशाची ती सुपरहिट जोडी उंची राहते.मात्र यातील परशाला म्हणजेच आकाश ठोसरला आपल्या जीवनात अभिनेता नाही तर पोलीस अधिकारी व्हायचं होत. हो हे खर आहे, स्वतः आकाशने याबाबत खुलासा एका केला आहे.
सध्या आकाश आपल्या आगामी घर बंदूक बिरयाणी या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच आकाशने एका मुलाखतीती त्याला अभिनेता व्हायचं नव्हतं असं म्हंटल आहे. आपल्या करिअरबाबत बोलताना आकाश म्हणतो,मला आजही हे सगळं स्वप्नवत वाटत आहे. कारण मोठं होऊन मी अभिनेता होईल आणि टीव्हीवर दिसेल असं मला कधीही वाटलं नव्हतं.
“दहावीनंतर मी तालमीत गेलो. तिथे मला नागराज मंजुळे सरांच्या भावाने पाहिलं. त्यानंतर त्यांनी मला चित्रपटात घेतलं. माझं सैराटच्या आधीचं आणि नंतरचं आयुष्य फार वेगळं आहे असंही आकाशने यावेळी सांगितले. तसेच मोठं होऊन पोलीस अधिकारी व्हायचं.. आई वडिलांसाठी घर घ्यायचं असं मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाला वाटत मलाही तसच वाटायचं असा खुलासा यावेळी आकाशने केला.
“सैराटआधी मी दोनदा पोलीस भरतीसाठी गेलो होतो. पोलीस व्हायचं हे माझं स्वप्न होतं. पण सैराटनंतर माझं पूर्णपणे आयुष्यच बदलून गेलं” असं आकाश म्हणतो. सैराटनानंतर आकाशने अनेक चित्रपट केले परंतु आजही प्रेक्षक त्याला परश्या म्हणूनच ओळखतात. त्याचा घर बंदूक बिर्यानी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.