पंढरपूर – लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान आणि संबंध महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेलं पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळच्या काकड आरती आणि नित्यपूजेनंतर विठ्ठल-रुक्मिणीला पारंपरिक दागिन्यांचा साज चढवून सुंदर पोशाख परिधान केला आहे.
तसेच मंदिराला सुद्धा आकर्षक पुलांची सजावट केली असून, मंदिरात फुलांचा दरवळ आणि भक्तीचा नाद दिसून येत आहे.
मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणीचे सुंदर पोशाखातील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. दागिन्यांचा साज आणि पोशाख या मध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे चैतन्य रूप दिसून येत आहे.