पिंपरी – मैत्रिणीसोबत चॅटींग केल्याच्या कारणावरून दोघांनी एका तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 24) दुपारी साडेपाच वाजता ग्लोबल एसईझेड या कंपनीत हिंजवडी येथे घडली.
धनंजय पंजाब नांगरे (वय 22, रा. हिंजवडी), गजानन सोनवणे (रा. हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ओम प्रमोद भगत (रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे पूर्वी एकाच ठिकाणी काम करत होते. आता फिर्यादी हे हिंजवडी येथील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.
मंगळवारी दुपारी आरोपी फिर्यादी हे ड्युटीवर असताना त्यांच्याकडे आले. ‘तू माझ्या मैत्रिणी सोबत फोनवर का चॅटींग करतो’ असे म्हणून फिर्यादी यांना बांबूने मारहाण करून शिवीगाळ केली. ‘जर तू माझ्या मैत्रिणीला संपर्क केला तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी आरोपींनी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.