पिंपरी -वेश्या व्यवसायासाठी सार्वजनिक सभ्यतेचा भंग करून नागरिकांना हातवारे करत अडथळा निर्माण केला. याप्रकरणी तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 25) सायंकाळी सव्वा पाच वाजता संविधान चौक भोसरी येथे घडली.
याप्रकरणी दीपक गुजर (वय 33, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिघी, पिंपळे गुरव आणि देहूरोड येथे राहणाऱ्या तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलांनी वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केले.