जयपूर – विद्युत विभागातील अधिकाऱ्याला मारहाण केल्याबद्दल आणि जातीयवाचक शेरेबाजी केल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाच्या एका आमदारासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी असिस्टंट इंजिनिअर हर्षदीपती यांनी तक्रार दाखल केली आहे. धोलपूरचे आमदार गिरीराज सिंह मलिंगा आणि इतरांनी आपल्याला आणि ज्युनिअर इंजिनिअर नितीन गुलाटी यांना सोमवारी मारहाण केली आणि जातीवाचक शेराबाजी केली, असे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
मात्र आमदार महोदयांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. या संदर्भात आमदार आणि इतरांविरोधातील प्रकरण दाखल करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण आणि सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे, असे धोलपूरचे पोलीस अधिक्षक शिवराज मीना यांनी सांगितले.
या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या अधिकाऱ्यांना आगोदर धोलपूरच्या रुग्णालयात आणि नंतर आग्र्याला नेण्यात आले आहे.