वाघोली – नळावर पाणी भरण्याच्या वादातून तिघांनी तीन महिन्याच्या गर्भवती महिलेला मारहाण केल्याची घटना वाघोली येथील गोरेवस्ती परिसरामध्ये शनिवारी (दि. १५) रोजी सकाळी घडली. पोटावर मारहाण झाली असल्याने रक्तस्त्राव होऊन महिलेचा गर्भपात झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील गोरेवस्ती परिसरामध्ये सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून रवि धोत्रे, रोहित धोत्रे व शांताबाई धोत्रे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली होती.
रोहित धोत्रे याने पोटावर केलेल्या मारहाणीत महिलेचा रक्तस्त्राव होऊ लागल्याने ससून हॉस्पिटल येथे गर्भपात करावा लागला. २५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन महिन्यापूर्वी वाद उकरून काढत मायलेकींना मारहाण करण्यात आली. यामध्ये २२ वर्षीय गर्भवती महिलेच्या पोटावर दगड लागल्याने रक्तस्त्राव होऊन त्या महिलेचा गर्भपात झाल्याची घटना वाघोलीतील विटकर चाळ परिसरात घडली होती.