आठ वर्षीय मुलाला चटके देणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

लहुजी सेनेची मागणी : नेवासा पोलीस ठाण्यात दिले निवेदन

नेवासा फाटा -वर्धा जिल्ह्यातील आरवी गावातील मातंग समाजाच्या आठ वर्षीय मुलाला तापलेल्या लादीवर बसवून चटके देणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली असून, याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वर्धा जिल्ह्यातील आरवी गावातील काही विकृत मनोवृत्तीच्या नागरिकांनी देवळात गेला म्हणून आठ वर्षाच्या मुलास तापलेल्या लादीवर बसऊन त्याला मारहाण केली. यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी केली.

तसेच सरकारच्या विरोधात मुंडन आंदोलन करणार असल्याचा ईशारा त्यांनी दिला आहे. निवेदनावर भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनिफ पठाण, राज्य प्रमुख सुरेश आढागळे, जिल्हाध्यक्ष शांतवन खंडागळे, संजय ससाणे, शिवाजी शिरसाठ, विजय शिरसाठ, अर्जुन ससाणे, महिला आघाडी प्रमुख मंगल चव्हाण, ज्योती भोसले, संतोष भारस्कर, किशोर भोसले यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.