मुंबई – सध्या आदिपुरुष चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. नुकतच आदिपुरुष चित्रपटासाठी तिरुपती येथे एक इव्हेंट पार पडला. ज्या कार्यक्रमासाठी अभिनेता प्रभास अभिनेत्री क्रिती सिनॉनसह सर्व टीम मेंबर्स उपस्थित होते. यादरम्यानच एक फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिग्दर्शक ओम राऊत क्रिती सिनॉनला किस करताना दिसत आहे. या फोटोमुळे दिग्दर्शक ओम राऊत चांगलेच चर्चेत आले आहेत.
तिरुपती मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर क्रिती मंदिर परिसरातून जात असताना ओम राऊत यांनी तिला आलिंगन दिल. यावेळी राऊत यांनी क्रितीच्या गालवर गुडबाय किस देखील केलं. मंदिर परिसरात घडलेल्या या प्रकारचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आंध्र प्रदेशातील भाजप नेते रमेश नायडू यांनी यासंबंधीचा एक फोटो ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. यानंतर ओम राऊत यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सुरु झालं. मंदिरातील पुजाऱ्यांनी देखील या प्रकाराबाबत आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली आहे.
धार्मिक स्थळांवर अशा प्रकारे चुंबन घेऊन निरोप घेण्याच्या आधुनिक परंपरेवरही लोकांनी सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे. भाजप नेते रमेश नायडू यांनी देखील याबाबत एक ट्विट केले आहे. नायडू आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”“इतक्या पवित्र ठिकाणी असं वर्तन योग्य आहे का? वेंकटेश्वर स्वामी मंदिरात अशाप्रकारे मिठी मारणं आणि कीस करणं हे अपमानकारक आहे” विशेष म्हणजे यावेळी नायडू यांनी ओम राऊत,क्रिती सिनॉन यांच्यासह युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील टॅग केलं आहे.
बॉलिवूड स्लेलीब्रेटींसाठी हा प्रकार रोजच्या जीवनातील सवय असली तरी नेटकऱ्यांना हा प्रकार चांगलचं खटकला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर यासंबंधी सवाल उपस्थित करायला सुरुवात केली आहे.तिरुमला येथे एका भव्य कार्यक्रमादरम्यान चित्रपटाचा शेवटचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. त्यानंतर चित्रपट बिग बजेट असल्याचे स्पष्ट झाले. नव्या ट्रेलरमुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे.
Chief Priest @csranga of Chilkur Balaji Temple, #Hyderabad, took strong objections over greetings between Bollywood actress @kritisanon and the director of upcoming movie #Adipurush#KritiSanon & #OmRaut greeted each other at #Tirumala temple premises that has raised objections. pic.twitter.com/BsmVkoEXye
— Surya Reddy (@jsuryareddy) June 7, 2023