पुणे – धायरी परिसरात सोमवारी पहाटेपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. धायरीसह नऱ्हे, वडगावचा काही भाग, सिंहगड रस्त्याचा काही भागात वीज बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली. तब्बल दहा ते अकरा तासांनंतर सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला.
धायरी परिसरातील वीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा बंद होता. ऐन पावसाळ्यात वीज नसल्याने नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली. पावसाळ्यात रात्री काही कारणाने वीज बंद झाली असेल. मात्र पहाटे वीजपुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र दुपारपर्यंत नागरिकांना वीजपुरवठा सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे वीजग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.
यासंदर्भात, महावितरणकडून सांगण्यात आले की, धायरी परिसरातील वीजवाहिन्यांमध्ये तांत्रिक घिाड झाल्याने वीजपुरवठा बंद होता. मात्र ही बाब लक्षात येताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर सकाळीच वीजपुरवठा सुरू करण्यात आला, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला.