टाइप 2 डायबिटीसच्या नियंत्रणातील अडथळे

निदानास विलंब झाल्यामुळे पश्‍चिम भारतातील 93 टक्‍के रुग्णांना त्वरित औषधोपचार दिली जातात. पश्‍चिम भारतातील 48 टक्‍के मधुमेहाने पीडित रुग्ण त्यांची औषधे घेण्यास विसरतात. टाईम 2 डू मोअर सर्वेक्षणाच्या मते पुण्यातील बहुतांश टाइप 2 डायबिटीज रुग्णांना कन्सल्टिंग डॉक्‍टरांनी लिहून दिलेल्या औषधोपचार घेण्यासाठी पुढील समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ते स्मृतिभ्रंशामुळे औषधाचा डोस चुकवतात. काहीजणांनी सांगितले की, त्यांना औषधे घ्यायला आवडत नाही. तसेच निदानास होणारा विलंब ही देखील प्रमुख आरोग्यविषयक समस्या आहे. पश्‍चिम भारतात 93 टक्‍के रुग्णांना पहिल्याच कन्सल्टेशनमध्ये औषधे लिहून देण्यात आली. म्हणजेच त्यांना टाइप 2 डायबिटीज मेलिटस आजार झालेला होता.

जगभरात टाइप 2 डायबिटी मेलिटसचे (टी2डीएम) प्रमाण सर्व आजारांमध्ये 90 टक्‍के आहे. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या मते एकट्या भारतामध्ये 72 दशलक्ष मधुमेहाने पीडित रुग्ण आहेत. ज्यामुळे भारत “डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ बनला आहे.

टाइप 2 डायबिटीजच्या अयोग्य नियंत्रणामुळे मूत्रपिंड निकामी होणे, रक्‍तवाहिन्यांचे नुकसान, आंधळेपणा, हृदयविषयक आजार व स्ट्रोक असे इतर आरोग्यविषयक आजार होऊ शकतात.

निदानास होणारा विलंब आणि आजाराच्या वाढत्या प्रमाणासाठी कारणे:

जीवनशैलीमधील जलद बदल हा भारतीयांमध्ये लवकर मधुमेह होण्यासाठी प्रमुख कारण आहे. निदानास होणाऱ्या विलंबासाठी प्रमुख कारण म्हणजे रुग्ण आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. निदानांतर्गत ग्लुकोज इंटोलेरन्स (प्री-डायबिटीज) आणि/किंवा टाइप 2 डायबिटीजच्या निदानास विलंब अशा घटकांमुळे आजाराच्या प्रमाणामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

आजाराचे लवकर निदान:
मधुमेह हा जटिल व जलदगतीने वाढणारा आजार आहे. हा आजार वाढल्यास अधिक उपचाराची आवश्‍यकता असते. नुकतेच लॅन्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या “व्हेरिफाय’ अहवालाने प्रथम टाइप 2 डायबिटीजच्या प्रभावी नियंत्रणासाठी लवकर निदान व उपचार पद्धतीच्या दीर्घकालीन वैद्यकीय लाभांची कसून चौकशी केली आहे.

“व्हेरिफाय’ अहवालामधील सकारात्मक परिणाम नवीनच निदान झालेल्या टाइप 2 डायबिटीज रुग्णांमध्ये लवकर उपचार सुरू करण्याच्या महत्त्वाची पुष्टी देतात.
भारतीय स्पेशालिस्टस्‌ जगभरातील मधुमेहाचा सामान्य प्रकार टाइप 2 डायबिटीज मेलिटससह नवीनच निदान झालेल्या रुग्णांसाठी पारंपरिक व टप्प्याटप्प्याने उपचार पद्धतीचा अवलंब करतात.

रुग्णांना प्रथम योग्य आहार व शारीरिक व्यायामाचा सल्ला दिला जातो. हे रक्‍तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे नसेल तर रुग्णांना जीवनशैलीमधील बदलांसह एकच औषध (किंवा मोनोथेरपी) दिले जाते. रुग्णांमध्ये होत असलेल्या सुधारणेसह डॉक्‍टर कालांतराने आणखी काही औषधे लिहून देतात. या कालावधीत टप्प्याटप्प्याने थेरपीमधून जात असलेल्या रुग्णांमध्ये रक्‍तातील शर्करा वाढल्यास हृदय, मूत्रपिंड व डोळे अशा महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो.

अलीकडील अहवाल “व्हेरिफाय’ चाचणीमधून (लॅन्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आलेला अहवाल) निदर्शनास आले आहे की, आजाराच्या निदानानंतर लवकर सुरू करण्यात आलेल्या संयुक्‍त उपचारामुळे (एकापेक्षा अधिक औषधे) टाइप 2 डायबिटीजने पीडित रुग्णांमध्ये आजार वाढण्याची शक्‍यता कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते. यामुळे टाइप 2 डायबिटीजमध्ये रक्‍तातील शर्करेवर नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत होऊ शकेल आणि मधुमेहाशी संबंधित आजारांपासून संरक्षण देखील होऊ शकेल. टाइम डू मोअर इन डायबिटीजसारख्या वैद्यकीय अभ्यासांनी

निदानानंतर आजाराच्या नियंत्रणामधील पोकळ्यांना दाखवले आहे:

1. आजारासाठी उपचार करण्यात आलेले अधिक रुग्ण त्यांच्या रक्‍तातील योग्य शर्करेच्या प्रमाणापर्यंत पोहोचले नाहीत. ज्यामुळे त्यांना अवयव व उतींचे नुकसान आणि आंधळेपणा येण्याचा धोका आहे.
2. अनेक रुग्णांमध्ये हायपोग्लिसेमिया (शर्करेचे कमी प्रमाण किंवा हायपो) टाळण्याबाबत गैरसमज आहेत. उदाहरणार्थ- मुंबई, पुणे, अहमदाबाद, पालघर व भोपाळ या भारताच्या पश्‍चिम भागातील शहरांमधील 70 टक्‍के रुग्णांना वाटते की, उच्च कॅलरी असलेले चॉकलेटचे सेवन करणे हा हायपो टाळण्यासाठी
सर्वोत्तम मार्ग आहे.

-डॉ. ए.जी. उन्नीकृष्णन

Leave A Reply

Your email address will not be published.