नवी दिल्ली – देशात काेराेनाबद्दलच्या बेपर्वाईत वाढ झाल्याने जाेखीमही वाढली. १६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत सक्रिय रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रासह पंजाब, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेशसारख्या राज्यांतील नवे रुग्ण वाढत चालले आहेत. नवे रुग्ण असलेल्या राज्यांची यादी आता लांबत चालली आहे. मंगळवारी एकूण नवीन रुग्ण संख्या कमी हाेऊन १२,२७६ अशी झाली एवढा मात्र दिलासा राहिला.
एक आठवड्यानंतर नवे रुग्ण १५ हजारांहून कमी झाले. जवळपास निम्मे रुग्ण अजूनही महाराष्ट्रात आहेत. गेल्या चाेवीस तासांत ९१ जणांचा मृत्यू झाला. ही संख्याही आदल्या दिवशीच्या तुलनेत कमी झाली. एकूण ८६ टक्के मृत्यू केवळ ६ राज्यांत झाले आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या १,६८, ३३१ झाली होती.
देशात वाढत्या रुग्णसंख्येबाबत आराेग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, केंद्राची संपूर्ण घडामाेडींवर निगराणी आहे. तामिळनाडू व पंजाबमध्ये केंद्राने पथके तैनात केली आहेत. हरियाणात निगराणी केली जात आहे. देशातील २२ राज्यांतील १४० जिल्ह्यांत काेराेनाचा आलेख वर आहे. १० दिवसांपूर्वी म्हणजे २२ जानेवारीपर्यंत अशा प्रकारचे १२२ जिल्हे हाेते. त्यापैकी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याशिवाय केरळ-९, तामिळनाडू-७, पंजाब व गुजरातच्या प्रत्येकी ६ जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या जिल्ह्यांत दाेन महिन्यांच्या तुलनेत काेराेनाची रुग्णसंख्या दरराेज वाढत चालली आहे.
हरियाणाच्या कर्नालमध्ये एका शाळेच्या वसतिगृहात 54 विद्यार्थी कोरोनाबाधित झाले. वसतिगृहाला उपचार केंद्र करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशात धर्मशाळाजवळील ग्यूतो विद्यापीठात 156 बौद्ध भिक्खू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ही संख्या सोमवारी १०० होती.