मोरगाव(प्रतिनिधी)- बारामती तालुक्यातील तरडोली येथे चोरट्यांनी बंद घराची रेकी करून घरफोडी केली. घरफोडीमध्ये अंगठी, चैन, बदाम असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना रविवारी (दि.13) घडली आहे.
मध्यरात्री चोरट्यांनी तरडोली येथील वसंत दगडू कदम यांच्या घरी कोणीही नसण्याची खात्री करून गेटचा मुख्य दरवाजा तोडला. गेटच्या आतमध्ये प्रवेश करुन बंद घराचे व बेडरूमचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.
चोरट्यांनी बेडरूमच्या कपाटातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पिळ्याची अंगठी व वीस ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन, बदाम, असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. चोरीबाबतची तक्रार कदम यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
अंधारात दुचाकी ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून तीन तरूणांचा मृत्यू, गावावर शोककळा
सातत्याने घोरफोडी होत आहे. त्यामुळे परिसरात दहशतीची वातावरण निर्माण झालेले आहे. यापूर्वी पवारवाडी, तरडोली, मासाळवाडी, लोणी भापकर येथून लाखो रुपये किमतीची गोठ्यातील जनावरे, शेळ्या-मेंढ्यांच्या चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी चोरट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.