डोर्लेवाडी : बारामती- नीरा नरसिंगपूर या बिकेबीएन रोडवर बारामती तालुक्यातील गुणवडी हद्दीत पिकअप Mh 45 Af 7657 आणि दुचाकी क्रमांक Mh 42 AL 5963 मध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकी वरील एक जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
रुपेश अंकुश लष्कर, रा. कऱ्हावागज याचा जागीच मृत्यू झालेल्या चे नाव असून स्वप्नील बाळू धोतरे रा. कऱ्हावागज हा गंभीर जखमी झाला आहे त्याला पुढील उपचारासाठी बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत बारामती शहर पोलीस तपास करून पुढील कारवाई करीत आहे.
या रोडवरती दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत यामुळे हा रोड धोकादायक बनला आहे. या रोडवरील अनेक गावातील ग्रामस्थांकडून गतिरोधक बसवण्याची मागणी होत आहे काही गावांमध्ये गतिरोधक टाकण्यात आले आहेत मात्र अजून काही गावामध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जाणीवपूर्वक गतिरोधक बसवण्याचे टाळाटाळ करत आहेत.
या रोडवर ते एक महाविद्यालय आणि चार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. या रोडचे गेली सहा महिन्यापूर्वी काम झाले आहे. या रोडवर आता वेगाची मर्यादा आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गेल्याच आठवड्यात बारामती तालुक्यातील सोनगाव या ठिकाणी हायवा गाडीने दुचाकी वरील दोघांना धडक दिली होती यात बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा याच रोडवरील बारामती तालुक्यातील गुणवडी हद्दीमध्ये मंगळवारी (ता.५) दुचाकी वरील दोन जणांना पिकअप गाडीने जोरदार धडक दिली आहे.
यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. यामुळे हा रोड मृत्यूचा सापळा बनत आहे या रोडवरील वाहनांच्या वेगाला मर्यादा आणण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थाकडून होत आहे.