बारामती दूध संघाकडून एक रुपया दरवाढ

बारामती -दुधाचा खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपया वाढ देण्याचा निर्णय बारामती तालुका दूध संघाने घेतला आहे. ही दरवाढ शुक्रवार (दि. 16) पासून लागू करण्यात येणार असल्याने दूध उत्पादकांना आता प्रतिलितर 28 रुपये दर मिळणार आहे, अशी माहिती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

बारामती तालुका दूध संघाची वार्षिक सर्वसाधरण सभा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेतेखाली नुकतीच पार पडली होती. त्यात पवार यांनी दरवाढीचे सूतोवाच केले होते. त्यानुसार संघाने ही दरवाढ दिली आहे. बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची अद्यापही टंचाई आहे तर जनावरांच्या चाराचाही गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून छावण्यांद्वारे शेतकरी आपले पशुधन जगवण्यासाठी धडपड करीत आहेत. अशा गंभीर दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळावा, यासाठी संघाने हा निर्णय घेतला असल्याचे जगताप, रायकर यांनी सांगितले.

संदीप जगताप म्हणाले की, बारामती दूध संघात प्रतिदिनी 2 लाख 10 हजार लिटर दुधाचे संकल होते. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता दूध संघाने तालुक्‍यात मुरघास प्रकल्प यशस्वीरित्या राबवला व जनावरांच्या छावण्यांवर लक्ष केंद्रीत केल्याने दुधाचे संकलन टिकवणे सोपे झाले. सध्या संघाकडून राबल्या जाणाऱ्या चारा छावणीत पळशी 900 तर जळगाव सुपे येथे 1300 जनावरांना लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.